दोघांचा मृत्यू ; रुग्ण संख्या पोहचली ५९ हजार २२२ वर
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्नांची संख्या लक्षणीय वाढत चालली आहे . प्रशासनाकडून कडक उपाययोजना करीत असून मात्र जनतेच्या दुर्लक्षांमुळे हि वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे . आज सर्वाधिक रुग्ण ३६८ रुग्ण आढळले असून आज एकूण १०२ रुग्ण बरे झाले आहे . रुग्नांची संख्या एकूण ५९ हजार २२२ झाले असून आज दिवसभरात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे . ,जळगाव शहरात १६४ सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत . त्या खालोखाल चाळीसगाव ५५ रुग्ण, जळगाव ग्रामीण ३४ रुग्ण आढळले आहेत . तसेच रुग्नांची संख्या ही ५९ हजार २२२ इतक्यावर जाऊन पोहचली आहे . बरे झालेलं रुग्ण ५६ हजार २७९ झाले असून १५६६ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत . आतापर्यंत कोरोनामुळे १३७७ जणांचा मृत्यू झाला आहे .
कोरोना रुग्ण तालुकानिहाय आकडेवारी
जळगाव शहर १६४ ,जळगाव ग्रामीण -३४, अमळनेर -५, भुसावळ -२३, चोपडा -२८, पाचोरा -२, भडगाव -२, धरणगाव – २, यावल ०, एरंडोल -६ , जामनेर -४, रावेर – ७, पारोळा -७ , चाळीसगाव ५५, मुक्ताईनगर- २३, बोदवड -३ इतर जिल्ह्यातील ३ रुग्ण असे एकूण आज ३६८ कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.