जळगाव – गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांचा वाढदिवसानिमित्ताने ‘इनोव्हेशन सेल’ चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्रीमती गोदावरी पाटील (आजी), गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील हे उपस्थीत होते.
महाविद्यालयामध्ये कोविड नियमांचे तंतोतंत पालन करुन तसेच सोशल डिस्टन्स ठेवून डॉ.उल्हास पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय पाटील यांनी मनोगत व्यक्त करुन डॉ.उल्हास पाटील यांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी उपप्राचार्य प्रा.प्रविण फालक, रजिस्ट्रार प्रा.ईश्वर जाधव यांनीही शुभेच्छा दिल्यात. डॉ.उल्हास पाटील यांनी शुभेच्छा स्विकारुन आपल्या भाषणात कार्यक्रमाचे कौतुक केले. महाविद्यालयाचा आढावा घेवून त्याबद्दल काही सूचक विधाने केली व महाविद्यालयाच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्यात. सूत्रंसचालन प्रा.शफिक अन्सारी यांनी केले.
नवनवीन कल्पनांना प्रत्यक्षात उतरविण्याचे कौशल्य
‘इनोव्हेशन सेल’ अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या स्टार्टअप सेंटरचे उद्घाटन डॉ.केतकी पाटील आणि इन्क्युवेशन सेंटरचे उद्घाटन डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. युवकांनी व्यावसायिक शिक्षण घेवून नोकरीच्या मागे न धावता व्यावयाकडे वळावे, या उद्देशाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इनोव्हेशन सेलची स्थापना करण्यात आली. यामध्ये इनक्युवेशन सेंटरच्या माध्यमातून युवकांना नाविण्यपूर्ण उत्पादनांसाठी प्रेरित करण्यात येते तसेच स्टार्टअप सेंटरच्या माध्यमातून नवनविन कल्पनांना प्रत्यक्ष उत्पादनामार्फत व्यवसायात रुपांतरीत करण्याचे कौशल्य प्राप्त होते. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेमार्फत महाविद्यालयातर्फे हे महत्वाचे पाऊल टाकले गेले आहे. इनोव्हेशन सेल संदर्भात प्राचार्य डॉ.विजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभते.








