नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) – शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देणारे टूलकिट प्रकरणात बंगळुरू येथील 22 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला दिल्ली सत्र न्यायलयाने जामीन मंजूर केला.

रवीला तिच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी मुख्य महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले.त्यावेळी तिला एक दिवसीय पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांचा रिमांड आज संपत होता. न्यायाधिशांनी नमूद केले की, तिच्यावर द्वेष पसरवणे, प्रिती पसरवणे ते भारतीय सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणे अशा आरोपांचा त्यात समावेश आहे. रवीची तिच्या सहआरोपींसोबत चौकशी करणे आणि त्यातून त्याची चौकशी करून यातील प्रत्येकाचा सहभाग निश्चित करणे, नि:पक्ष तपासासाठी आवश्यक आहे.
तत्पुर्वी, ऍडव्होकेट निकिता जेकब, अभियंता शंतनु मुळुक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी यांची टूलकीट प्रकरणात सोमवारी एकत्रित चौकशी करण्यात आली. जेकब आणि मुळुक यांची चौकशी करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या द्वारका येथील सायबर सेलच्या कार्यालयात ही आज पुन्हा चौकशी करण्यात आली.







