जळगाव ;-आपल्या आईवर मुंबईत शस्त्रक्रिया न झाल्याने आलेल्या नैराश्यातुन जळगावातील एका १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज उघडकीस आली असून यामुळे खळबळ उडून हळहळ व्यक्त होत आहे . कोमल सुनील भालेराव (१९) रा. तळेले कॉलनी जळगाव असे मयत तरुणीचे नाव आहे .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , नैराश्यातून कोमल सुनील भालेराव (१९) या तरुणीने तळेले कॉलनीत राहणारे सुनील गोरख भालेराव यांची पत्नी सुनंदा यांना कानाचा आजार होता, त्यावर उपचार व शस्त्रक्रीया करण्यासाठी दाम्पत्य मुंबईला गेले होते. घरी मुलगी कोमल व भाऊ शुभम असे दोन्ही जण होते . आईची शस्त्रक्रिया होऊ शकली नाही असे तिला तिच्या वडीलांनी सायंकाळी फोन करुन कळविले. कोमल ही याच गोष्टीमुळे नैराश्यात आली व घरात वरच्या मजल्यावर साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली . शुभम हा जीमला गेला होता. तेथून रात्री ८ वाजता परत आला असता दरवाजा आतून बंद होता. आवाज देऊनही कोमल प्रतिसाद देत नसल्याने शुभम याने खिडकीतून डोकावून पाहिले असता तिने साडीने गळफास घेतल्याचे दिसले. घाबरलेल्या अवस्थेत त्याने घरमालक किरण यादव तळेले यांना हा प्रकार सांगितला.त्यांनी शनी पेठ पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, हवालदार प्रमोद पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून दरवाजा तोडून कोमल हिला शासकीय रुग्णालयात हलविले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषीत केले.