जळगाव – गोदावरी फाऊंडेशन संचलित जळगाव, भुसावळ, सावदा येथील शाळांमध्ये तसेच डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात आज शिवजयंतीनिमित्त मान्यवरांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात शिवजयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉ.एन.एस.आर्विकर, डॉ.केतकी पाटील, डॉ.माया आर्विकर, डॉ.जया शिंदे, डॉ.स्नेहल गवारे, डॉ.दिपीका ललवाणी, डॉ.शुभांगी चौधरी आदि उपस्थीत होते. रुग्णालयासमोर शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली रांगोळी साकारण्यात आली. याप्रसंगी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर अभिवादन करण्यात आले.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालय, डॉ.वर्षा पाटील इन्स्टीट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग, डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्यासह गोदावरी सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूल जळगाव, डॉ.उल्हास पाटील सीबीएसई स्कूल, सावदा आणि डॉ.उल्हास पाटील सीबीएसई स्कूल, भुसावळ या शैक्षणिक संस्थांमध्ये शिवजयंती कोरोनाचे नियम पाळून साजरी करण्यात आली.