जळगाव ;- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व विद्यार्थी विकास विभाग संयुक्त विद्यमाने शिव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम महावियालयाचे उपप्राचार्य डॉ एस. पी. शेखावत यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला फुलहार वाहून अभिवादन केले. तसेच या दिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयातर्फे ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात विद्यार्थ्यांना ” छत्रपती शिवाजी महाराज यांचे सैन्य आणि नागरिक प्रशासन ” या विषयावर घेण्यात आली. विद्यर्थ्यांनी घरून सदर स्पर्धेत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. वाणी यांचे मोलाचे मागदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ एस. पी. शेखावत , बी. सी. कछवा, डॉ. एम हुसेन (विभाग प्रमुख स्थापत्य विभाग ), डॉ. एस एल पाटील (रेक्टर), एस . आर. गिरासे (असि. रजिस्ट्रार), प्रा. एन वाय घारे ,व्ही . एम . मोरे, श्री. अशोक पाटील , श्री. प्रकाश एम पाटील , सुभाष पाटील, चंद्रकांत बोरसे , जयपाल देशमुख , गोकुळ पाटील हजर होते कार्यक्रमासाठी श्री एम व्ही रावलानी व आर. बी. सांगोरे यांनी परिश्रम घेतले.