पाचोरा ;- पाचोरा शहरात शिव जयंतीनिमित्त मराठा समाजाच्या विविध संघटनेच्या पदाधिकारी व युवकांनी संपूर्ण शहरात मोटरसायकल रॅली काढून शिवजयंती उत्सव साजरा केला. यामध्ये मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, तहसिलदार कैलास चावडे, नगराध्यक्ष संजय गोहिल, पालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, उपनगराध्यक्षा प्रियंका वाल्मिक पाटील, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील, संजय वाघ, डॉ. भुषण मगर, डॉ. स्वप्निल पाटील, यांचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, काँग्रेस, आर.पी.आय.चे पदाधिकारी व मराठा समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी माल्यार्पण करुन शिवजयंती साजरी केली.