पुणे (वृत्तसंस्था) – चाकण (ता. खेड) येथे सहा वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून चाकण पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात नराधमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या मुलीच्या आईने याबाबत फिर्याद दिली. एका अज्ञात नराधमाने संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील 20 ते 26 मार्च 2020 या कालावधीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.