जळगाव;- जळगाव शहरातील उद्योजक रवींद्र लढ्ढा यांची सुकन्या डॉ.पायल लढ्ढा यांच्या लग्ना निमित्त लढ्ढा परिवारातर्फे ज्योती हिरामण मेढे वय 37 रा.धामोडी ता.रावेर अनिता सुभाष वंजारी वय 35 रा.तरडी ता.पारोळा सोनाली विजय पाटील वय 33 रा.खेडीढोक ता.पारोळा मनीषा प्रल्हाद पाटील वय 36 रा.शिरसोदे ता.पारोळा भरारी फाउंडेशनच्या शेतकरी संवेदना अभियानांतर्गत आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या या चार विधवा महिलांना मसाला व पीठ दळण्याच्या चार चक्की देण्यात आल्या. यामुळे त्या विधवा व निराधार महिलांना रोजगार निर्माण होणार असून ते स्वावलंबी होऊ शकतील.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून समाजात एक चागला संदेश गेला आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, चिटणीस पंकज लोखंडे, रवी लढ्ढा ,ज्योती लढा, श्रीराम पाटील, धनंजय खडके राजेश न्याती व भरारीचे दीपक परदेशी ,विनोद ढगे ,सचिन महाजन सुदर्शन पाटील, दुर्गेश आंबेकर, बंडू पाटील, मोहित पाटील उपस्थित होते.

भरारी फाउंडेशन मार्फत अभिनव उपक्रम
भरारी फाउंडेशन मार्फत दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या केलेल्या विधवा महिलांना स्वावलंबी व त्यांच्या पायावर ऊभ करण्यासाठी पाच वर्षा पासून अभियान सुरू केले आहे. आता पर्यंत 28 महिलांना भरारीचे रोजगारासाठी उभं केलं आहे व त्यांच्या मुलां मुलींचं शिक्षनाची व मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेतली आहे. 5 वर्षा पूर्वी रवींद्र लढ्ढा यांच्या मुलाचे लग्न झाले. तेव्हाही रवींद्र लढा यांच्या तर्फे 6 विधवा महिलांना चक्की व पिको फॉल मशीन मदत स्वरूप देण्यात आली होती.







