पाटणा (वृत्तसंस्था ) ;- पाचवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या ‘त्या’ मुख्याध्यापकाला पटनाच्या सिव्हील कोर्टाने रेअरेस्ट ऑफ रेयर ठरवून दोषी अरविंद कुमार याला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. तर यासाठी त्यांना मदत करणाऱ्या अभिषेक कुमार याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

तीन वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. आरोपींना मंगळवारी दोषी ठरवण्यात आले आहे. बिहारच्या पाटणा शहरातील फुलवारीशरीफ परिसरातील न्यू सेंट्रल पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापक अरविंद कुमार याने 2018 सप्टेंबर रोजी आपल्याच शाळेतील 5 वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला होता. यासाठी शाळेतील लिपिक अभिषेक कुमार याने त्याची साथ दिली होती. मात्र घाबरलेल्या मुलीने याबाबत घरी कोणाकडे वाच्यता केली नव्हती. पीडितेच्या पोटात अचानक दुखू लागल्याने तिला घरच्यांनी दवाखान्यात नेले असता ती गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.
आपली एवढी लहान मुलगी गर्भवती असल्याचे ऐकताच घरच्यांना मानसिक धक्काच बसला होता. मात्र मुलीला विचारले असता शाळेच्या मुख्याध्यापक आणि लिपिकाचे तिने नाव घेतले होते. पीडित मुलीने शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या केबिनमध्ये बलात्कार केला होता.







