जळगाव ;- दहावीच्या मुलांना शालेय स्तरावरील आंतरर्गत वीस गुण सरसकट प्रदान करावे तसेच जे विद्यार्थी इलिमेंटरी पास आहेत ,व इंनटर मेडीयल यावर्षी कोरोनामुळे झाली नाही म्हणून त्या विद्यार्थीचे तसेच क्रिडा नैपुण्याचे वाढीव गुणसाठीचे नुकसान होता कामा नये ते गुण सुद्धा त्यांना प्रदान करावे व परीक्षेचे स्वरूप सुद्धा सोपे व जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ असावे अश्या मागण्याचे निवेदन भाजप चे जिल्हाध्यक्ष शिक्षण आघाडी प्रवीण जाधव यांनी शिक्षण मंत्रीयांना दिले.
राज्यात कोरोनाचे रुग्ण रोज वाढत आहे राज्यातील जबाबदारी मंत्री चिताजनक व्यक्तव्य करत असताना व कोरोन वर्षाची पाश्र्वभूमी असताना मुलांना शाळेत कायद्याने येणे बंधनकारक नसतांना काही शाळा प्रशासनाने पूर्व परीक्षा व प्रोजेक्ट स्वाध्याय जमा करण्यासाठी शाळेत येणे बंधनकारक केले हे अजिबात ठीक नाही स्थानिक शिक्षण विभागाने यांची दखल घ्यावी व शाळांना तशी समज द्यावी अशी मागणी भाजपा शिक्षण आघाडी सर्व पदधिकारी यांनी केली.








