पाचोरा – तालुक्यातील कुरंगी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. पदाधिकारी निवडणुकीच्या निर्धारित कार्यक्रमानुसार येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज की 15 फेब्रुवारी रोजी निर्धारित वेळेत सरपंच पदासाठी मनिषा गणेश पाटील आणि उपसरपंचपदासाठी शालिग्राम बाजीराव पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ऐ .व्ही. जाधव यांनी ही निवडणूक बिनविरोध घोषीत केली.यावेळी विशेष सभेला मनिषा गणेश पाटील सरपंच शालिग्राम बाजीराव पाटील उपसरपंच त्याचप्रमाणे सिमा नगराज पाटील .मंगलाबाई पंढरीनाथ पाटील.योगेश शांताराम पाटील. दिनेश ताराचंद सोनवणे. अविनाश अरुण कोळी . असे एकूण सात सदस्य उपस्थित होते. तर 4 सदस्य गैरहजर होते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार नगराज पाटील. रंगराव पाटील. भिकाजी पाटील . रमेश पाटील.रामचंद्र धनगर.पंढरीनाथ पाटील योगेश पाटील.नंदलाल पाटील.हरी कोळी. आप्पा भोई.अरुण पाटील. ज्ञानेश्वर पाटील.गणेश पाटील.दादाभाऊ मोरे. सुरेश कोळी. मधुकर पाटील . मकुंदा पाटील.देविदास पाटील.अरूण कोळी.आधार सोनवणे.कासम खाटीक यांनी नवनिर्वाचित सदस्य व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या . ग्रामसेवक अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.तर पोलीस प्रशासनातर्फे प्रकाश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

दुर्घटनेनंतर राज्य सरकारने सर्व महत्वाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. यामधील एका कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहणार होते. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या एक लाख घरांच्या लाभार्थ्यांसोबत अमित शाह सकाळी ११ वाजता संवाद साधणार होते.







