मुक्ताईनगर ( प्रतिनीधी ) ;- निमखेडी बुद्रूक ग्रामपंचायतीची सरपंच व उपसरपंच पदाची निवड दि.15 रोजी झाली . यात शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शितल गणेश सोनवणे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. सौ शितल गणेश सोनवणे या वार्ड क्रमांक 2 मधुन सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या . तसेच उपसरपंच म्हणून प्रमोद सुदाम इंगळे यांची ही बिनविरोध निवड करण्यात आली असुन निमखेडी बुद्रूक ग्रामपंचायतीत पहील्यांदाच बिनविरोध सरपंच व उपसरपंच यांची निवड झाली आहे. या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीसाठी शिवसेना पक्षाचे आ, चंद्रकांत पाटील , शेषराव कांडेलकर , प्रभाकर सोनार सुभाष डिवरे जगदेव सांभारे प्रमोद सोनार अमोल कांडेलकर महादेव बेलदार विशाल नारखेडे सूर्यकांत महाजन प्रमोद घाटे नामदेव गव्हाड बाळू पाटील सहकार्ये लाभले. तसेच नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य सौ शितल गणेश सोनवणे, प्रमोद सुदाम इंगळे संजय भास्कर चोपडे, बरसु रामभाऊ पाटील ,संगीता घनश्याम गाजरे ,पुष्पा विजय सावळे ,यांचा ही यावेळी नागरिकांन तर्फे सत्कार करण्यात आला . नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.








