पारोळा ;- शेतकऱ्यांना कोणत्याही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जात आहे.बिल भरण्यासाठी तगादा लावला जात आहे.तसेच घरगुती कनेक्शन देखील पूर्वसूचना न देता खंडित करण्यात येत आहे.हे त्वरित थांबवा अशी मागणी उपकार्यकरी अभियंता प्रसाद पाटील यांच्याकडे भाजपने निवेदनाद्वारे केली आहे.

महाविकास आघाडी सरकारने इतर आकार व व्याज माफ करून थकलेले बिल भरण्यासाठी सवलत देऊ असे सांगितले होते मात्र पण प्रत्यक्षात वीज बिल भरण्यासाठी शेतकऱ्याकडे तगादा लावला जात आहे.वीज बिलावरील इतर आकार व व्याज माफी केलेली नाही.कोणतेही पूर्व सूचना न देता शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे.अशाचप्रकारे कोणतेही पूर्वसूचना न देता घरगुती वीज कनेक्शन देखील खंडित करण्यात येत आहे.निवेदनाची दखल न घेतल्यास भाजपा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा,जिल्हा उपाध्यक्ष रेखा चौधरी,जिल्हा चिटणीस रवींद्र पाटील,शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी,सचिन गुजराथी, नरेंद्र राजपूत,समीर वैद्य,गणेश पाटील,श्याम पाटील,जितू गिरासे,महेंद्र भावसार,धनंजय बोरसे उपस्थित होते.







