चाळीसगाव;- जनहिताला प्राधान्य देत समस्या मार्गी लावण्याकरीता रयत सेनेचे कार्य असून सामाजिक क्षेत्रात संघटना सर्व सामान्य जनतेला भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी रयत सेना अग्रेसर राहीली असून यापुढे ही रयत सेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता व ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन पिपळवाड निकुंभ येथे दि १२ रोजी रयत सेना शाखा उद्घाटन प्रसंगी संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी केले.
तालुक्यातील पिपळवाड निकुंभ येथे दि १२ फेब्रुवारी रोजी रयत सेना शाखा उद्घाटन संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास रयत सेना प्रदेश कार्याध्यक्ष संतोष निकुंभ (संता पहेलवान), ह्युमन राईटस अध्यक्ष सुमित भोसले यांची प्रमुख उपस्थिती
होती.प्रारंभी पिपळवाड निकुंभ शाखेच्या अध्यक्षपदी भरत कुटे, उपाध्यक्ष विलास निकम ,कार्याध्यक्ष गौतम देवरे ,कोषाध्यक्ष भूषण लोधे, संघटक समाधान डोंगरे, सचिव प्रदीप जगताप, सहसंघटक सचिन लोधे, प्रसिद्धी प्रमुख युवराज निकम, समन्वयक अविनाश ताडगे ,सहकार्याध्यक्ष अनिल डोंगरे यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यानी जाहीर केली.
गणेश पवार म्हणाले की रयत सेनेच्या माध्यमातून जनसामान्य जनतेकरीता आरोग्य शिबीर, विद्यार्थ्यांसाठी करीयर मार्गदर्शन, कोरोना काळात रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थी गुणगौरव ,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,गरीब भिक्षूकाना ब्लॅकेट वाटप,सर्व सामान्य महिला आरोग्य शिबिरात मोफत तपासणी करीता आर्थिक मदत,बाजार समितीत शेतकऱ्यांना तुर व कांदा दरात अन्याय होत असताना शेतकऱ्यांना सोबत घेत आंदोलन करून जादा दर मिळून देण्यात आला .शेतकरी आत्महत्या कुंटुंबग्रस्ताना आर्थिक मदत.गोरगरीबांना हॉस्पिटल बिल भरण्यासाठी आर्थिक मदत.असे अनेक विविध उपक्रम रयत सेनेने राबवले आहेत शिवाय समाजोपयोगी आंदोलनात संघटना सदैव अग्रेसर राहीली असल्याचे पिपळवाड निकुंभ येथे दि १२ रोजी शाखा उद्घाटन प्रसंगी संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी सांगितले.
यावेळी रयत सेनेचे जिल्हाअध्यक्ष संजय कापसे ,तालुका उपाध्यक्ष विलास मराठे ,सागर सूर्यवंशी ,पिपळवाड निकुंभ मा. सरपंच नाना जगताप,तुषार देशमुख,शिरीष नाना, ओंकार जगताप, सुनील रघुनाथ लोधे, इस्माइल शेख, गणेश लोधे , वैभव लोधे, भीमा कुटे, भाऊसाहेब निकम, विकास ताडगे, बाबासाहेब ताडगे यांच्यासह रयत सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.








