निपाणे ता एरंडोल (वार्ताहर) : येथून जवळच असलेल्या भातखेडे येथील शेतकरी अरुण शिवराम बडगुजर यांचे पिंप्रीसीम शिवारात शेत जमीन असून बागायती क्षेत्रावर ऊस लागवड केली आहे सध्या ऊस तोडण्याचे काम चालू असताना सदर ऊसाच्या शेतातून पळून जातांना बिबट्या दिसल्याने ऊस तोड कामगारांत एकच खळबळ उडाली.
जो तो जिव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत गावात गावात आले त्यामुळे बिबट्या बाबत भितीचे वातावरण निर्माण झाले असून सदर बिबट्या चा वनविभागाने त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी भयभीत शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. सध्या बिबट्या च्या धाकाने कुणीही शेतकरी शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नसून शेतकरी वर्गाला आपला शेत माल घरात आणण्याची चिंता लागली आहे. गेल्या तीन चार महिन्यांपूर्वी चिंधा कुंभार यांच्या मालकीच्या दुभत्या गाईचा बिबट्याने फडशा पाडला होता.








