जळगाव;- तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम तहसीलदारांनी जाहीर केला आहे. त्यात २४ सरपंच, उपसरपंचाची निवड सोमवारी होणार आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत अर्ज दाखल करता येतील. तर निवड हाेणाऱ्या गावांत शिरसोली, म्हसावद, आसोदा,आवार, कानळदा, कुसुंबा, भादली बुद्रुक, फुपनगरी, धानवड, भोकर, बोरनार, नांद्रा बुद्रुक, सावखेडा बुद्रुक, मोहाडी, रायपूर, जळगाव खुर्द, फुपणी, वडली, वावडदा, शेळगाव-कानसवाडे, मन्यारखेडा, रिधूर, गाढोदा, नांद्रा खुर्द-खापरखेडा यांचा समावेश अाहे.