जळगाव (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील किनगाव येथे आज मध्यरात्रीच्या सुमारास पपईची वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून यात आणखी मजुरांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त करण्यात असून राज्य महामार्गावरील अंकलेश्वर बराणपुर रस्त्यावर हा अपघात झाला आहे
धुळे जिल्ह्यातून पपई घेऊन जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अपघात झाला. रस्त्यावर मोठा खड्डा असल्याने हा ट्रक उलटला. यातील १५ मजूर जागीच मृ्त्यूमुखी पडले. या ट्रकमध्ये एकूण २१ मजूर असल्याची माहिती मिळाली. त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत. मृत व जखमी मजुरांना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व मजूर हे रावेर तालुक्यातील आभोडा, के-हाळा व रावेर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी साडेसातच्या सुमारास भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी ग्रामीण रूग्णालयाला भेट दिली. यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनीही रूग्णालयाला भेट दिली.
मयताचे नावे
१) शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार (वय ३०) रा.फकीर वाडा रावेर
२) सरफराज कासम तडवी (वय ३२) रा.के-हाळा ता.रावेर
३) नरेंद्र वामन वाघ (वय २५) रा.आभोडा ता.रावेर
४) डिगंबर माधव सपकाळे (वय ५५) रा. रावेर
५) दिलदार हुसेन तडवी (वय २०) रा. आभोडा ता.रावेर
६) संदीप युवराज भालेराव (वय २५) रा. विवरा ता. रावेर
७) अशोक जगन वाघ (वय ४०) रा. आभोडा ता. रावेर
८) दुर्गाबाई संदीप भालेराव (वय २०) रा. आभोडा ता. रावेर
९) गणेश रमेश मोरे (वय ०५) रा. आभोडा ता. रावेर
१०) शारदा रमेश मोरे (वय १५) रा. आभोडा ता. रावेर
११) सागर अशोक वाघ (वय ०३) रा. आभोडा ता. रावेर
१२) संगीता अशोक वाघ (वय ३५) रा. आभोडा ता. रावेर
१३) सुमनबाई शालीक इंगळे (वय ४५) रा. आभोडा ता. रावेर
१४) कमलबाई रमेश मोरे (वय ४५) रा. आभोडा ता. रावेर
१५) सबनुर हुसेन तडवी (वय ५३) रा। आभोडा ता. रावेर
यांचा समावेश आहे. मृत्यूची संख्या वाढु शकते