पाचोरा (प्रतिनिधी) – अंतुर्ली फाट्याकडुन पाचोरा शहराकडे येत असतांना दोघा तलाठींचा गंभीर अपघात झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .
तालुक्यातील सामनेर सजाचे तलाठी रमेश दांडगे व कुर्हाड सजाचे तलाठी प्रविण पवार हे अंतुर्ली फाट्याकडुन पाचोरा शहराकडे येत असतांना निर्मल सिड्स जवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. दोघा गंभीर जखमींना अॅब्लुलन्स चालक निळु पाटील व किशोर लोहार यांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले यावेळी रमेश दांडगे यांची तब्येत चिंताजनक होती. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी भेट दिली. जखमींवर डॉ. अभिषेक पाटील डॉ. स्वप्निल पाटील यांच्यासह हॉस्पिटलच्या कर्मचारींनी शर्थीचे प्रयत्न करुन जीव वाचवण्यास यश मिळविले.