कुऱ्हा काकोडा ता, मुक्ताईनगर;- प्रतिनिधी ;- आज दिनांक ११/ २ / २१ रोजी ग्रामपंचायत कार्यालय राजुरे ता, मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथील सरपंच पदा च्या निवडणुकीसाठी 02 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. त्यापैकी सौ पुष्पा अशोक भोलांणकर व सुकिर्ती संजय कांडेलकर, असे एकूण दोन अर्ज आले होते. ते दोन्ही अर्ज वैध ठरविण्यात आले होते, नंतर निवडणूक अधिकारी यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी दोन्ही उमेदवार घोषित करण्यात आले होते . दोन्ही उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक अधिकारी यांनी मतदान कोणत्या पद्धतीने घेण्याचे विचारले असता उमेदवाराने व सदस्यांनी ओपन पद्धतीने बोटे वर करून घेण्याचे निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितले, म्हणून सौ पुष्पा अशोक भोलांणकर यांना हात वर करुन मतदान प्रक्रियेमध्ये सरपंच पदासाठी असलेल्या उमेदवारांना हाता वर करून मतदान केले. त्यामुळे सौ पुष्पा अशोक भोलांकर यांना 4 मते पडली व सौ, कीर्ती संजय कांडेलकर यांना 2 मते पडली एकूण(07) सदस्यांपैकी(06) हजर व(1) सदस्य गैरहजर त्यामुळे सौ पुष्पा अशोक भोलांणकर यांना जास्त मते पडल्याने ग्रामपंचायत राजुरा सरपंच म्हणून निवड करण्यात आली असे जाहीर करण्यात आले.
उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांचे पत्र दाखल झाले होते(1) राहुल अप्पा रोटे(2) सौ आशाबाई नथू भोलांणकर असे 2 उमेदवार अर्ज भरले होते व ते निवडणूक अधिकाऱ्यांनी वैध ठरवण्यात आले होते, त्याच वेळी सौ आशा नथू भोलांणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने श्री राहुल अप्पा रोठे यांची उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली,.
या निवडणुकीसाठी सर्व ग्राम सदस्य नर्मदा योगेश कांडेलकर, पंढरी केशव कांडेलकर, सौ, कीर्ती संजय कांडेलकर, अशोक भोलांणकर. सौ पुष्पा अशोक भोलांणकर, राहुल रोटे. सौ आशा बाई नथू भोलांणकर ही निवडणुक यशस्वी करण्यासाठी श्री वसंत भोलांण कर निना तायडे अंबादास येळे योगेश कांडेलकर शिव शंकर भोलांणकर पुडलिक सरक बळीराम कांडेलकर भीमा रोटे रामेश्वर भोलांणकर वाल्मीम भोलांणकर सुनील रोटे अनिल झनके अशा ग्रामस्थांनी सहकार्य केले
राजुरा येथील ग्रामपंचायत सदस्य 7 बिनविरोध झाले होते
आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवून ही सदस्य निवडणूक बिनविरोध झाली होती पूर्ण चे पूर्ण सदस्य शिवसेनेचे होती परंतु शिवसेनेच्या सदस्यांमध्ये गटबाजी झाल्यामुळे गटA चे नेतृत्व श्री शिव शंकर भोलांणकर यांनी केले, व B गट चीन नेतृत्व श्री श्रावण धाडे यांनी केले,
मात्र गटाचे नेतृत्व करणारे शिव शंकर भोलांणकर यांच्या गटाला सरपंच पदाची संधी मिळाली . त्यामुळे सर्व गावांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
सरपंच निवडून आल्यानंतर सर्व गावांमध्ये यांनी प्रभातफेरी काढली व नागरिकांचे दर्शन घेतले सत्कार समारंभ झाला आणि नंतर सत्कार समारंभ संपला असे जाहीर करण्यात आले.
या निवडणुकीसाठी निवडणूक साठी अध्यासी म्हणून एस एस बाविस्कर अव्वल कारकून तहसील कार्यालय मुक्ताईनगर यांनी काम पाहिले व ग्रामपंचायत सचिव एम एस घोडके यांनी त्यांना सहकार्य केले.