जळगाव ( प्रतिनिधी ) ;- जामनेर शहरातील नवकार प्लाझा कॉम्प्लेक्स्मधून २५ हजार रुपयांचा लॅपटॉप चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याला पुढील कारवाईसाठी जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि ,
८ रोजी
शहरातील नवकार प्लाझा कॉम्प्लेक्स् मधील फिर्यादी.जितेंद्र वसंत पाटील यांचे ई – सेवा दुकानातुन- २५ हजार किमतीचे (रे कंपनीचे काळया रंगाचे लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली होती . याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता .
पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी जळगाव , अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे कामी
पथके स्थापन करणे बाबत सुचना वा मार्गदर्शन केले होते. पोलीस निरीक्षक .किरणकुमार बकाले यांना गोपनिय माहिती मिळाली की, पाळधी ता.जामनेर
येथील राहणारा अक्षय प्रकाश छाडेकर हा एक लॅपटॉप घेवुन विक्रीसाठी फिरत आहे.स्थानिकगुन्हे शाखेकडील पोहेकॉ.प्रदीप पाटील, सुनिल दामोदरे, विजय पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील ,सचिन महाजन, पंकज शिंदे अश्ांना पाळधी ता.जामनेर येथे रवाना केले होते.
बातमी प्रमाणे वरील पथकाने पाळधी ता.जामनेर येथे जामनेर – नाचनखेडा चौफुली वर यश कोल्ड्रिंक समोर एक इसम हातात लॅपटॉप सारखे काहीतरी घेवुन उभा आहे. त्यास पंचासमक्ष ताब्यात घेतले असता तो अक्षय प्रकाश छाडेकर वय – २३ , भोईगल्ली पाळधी ता.जामनेर जि.जळगाव हा रेकॉर्ड वरील गुन्हेगारअसुन त्याचे ताब्यात जामनेर पोलीस स्टेशन भाग – ५ गुरन.३७/२०२१ भादवि.क.३८० या गुन्हयातील लॅपटॉप मिळुन आल्याने त्यास अधिक तपास कामी जामनेर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.








