भडगाव- शहरातील एरोंडोल रस्त्यावरील टीसिडी फॉर्म जवळ मेहताब नाईक यांच्या शेतातील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याची घटना ८ रोजी सकाळी सात वाजे सुमारास घडली असून शेतकरी आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे .
याबाबत शेतकऱ्यांनी तहसिलदार सागर ढवळे यांना निवेदन दिले .
या बाबत अधिक असे की,शहरातील एरोंडोल रस्त्यावरील टीसिडी फार्म जवळ मेहताब नाईक यांचे शेत आहे या शेतात निंबु बागेत पाळीव कुत्रा होता. त्याच्यावर आज सकाळी सात वाजे दरम्यान बिबट्याने हल्ला करून त्याचा फाडशा पडला.अन्यथा कुठलीही जीवित हानी झाल्यास सर्वस्वी जबाबदारी वनविभागाची असेल असे निवेदन तहसिलदार सागर ढवळे यांना शेतकऱ्यांनी दिले. या वेळी प्रकाश राठोड, सोमनाथ पाटील, भागवत पाटील, धर्मराज महाजन, टी. एस. पाटील, अनिल महाजन, रवींद्र शिरसाठ, युनूस पिंजारी, नाना उशीर, कांतीलाल पाटील, उमेश चौधरी आदी शेतकरी उपस्थित होते.








