श्रीनगर (वृत्तसंस्था) – आज पहाटे जम्मू-काश्मीरातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याचे वृत्त असून रिश्टर स्केलवर याचे ३.५ मापन नोंदविण्यात आले आहे.

आज सोमवारी पहाटे जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर हा भूकंप ३.५ होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे ४:५६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्याने अनेक ठिकाणी नागरिक घराबाहेर पळत सुटल्याचे वृत्त. यामुळे अनेक भागांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्मित झाले होते. यामध्ये आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा मालमत्तेचे हानी झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे.







