नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनावरून सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. आम्ही ‘बुद्धीजीवी’ हा शब्द ऐकला होता. परंतु आता काही लोकं ‘आंदोलनजीवी’ झाले आहेत. देशात काहीही झालं की ते त्या ठिकाणी पोहोचतात. कधी ते पडद्याच्या मागे असतात तर कधी पुढे. अशा लोकांना ओळखून आपल्यालाला त्यांच्यापासून वाचायला हवं, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा शाधला.

“जे आंदोलनजीवी लोकं आहेत ते स्वत: आंदोलन चालवू शकत नाहीत. परंतु कोणाचं आंदोलन सुरू असेल तर ते त्या ठिकाणी पोहोचतात. ही लोकं कोणत्याही ठिकाणी सापडतात. वकिलांच्या आंदोलनात वकीलांसोबत ते दिसतील, विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही तेच असतात, कधी मागे तर कधी पुढे येऊन ते आंदोलनात सहभागी होतात. वेगवेगळ्या आंदोलनातून ते त्यांचे विचार आणि चुकीच्या, भ्रामक गोष्टी पसरवात. सर्वच आंदोलनजीवी हे परजीवी असतात. ते आंदोलनाशिवाय जगू शकत नाही,” असंही मोदी म्हणाले.
“सध्या नवा FDI आला आहे. त्या ‘फॉरेन डिस्ट्रक्टिव आयडियोलॉजी’पासून आपल्याला वाचलं पाहिजे, असंही आंतरराष्ट्रीय कटाबद्दल बोलताना मोदींनी नमूद केलं. जे लोकं भारताला अस्थिर करू इच्छितात त्यांच्यापासून आपल्याला सतर्क राहणं आवश्यक आहे. पंजाबचं विभाजन झालं, १९८४ च्या दंगली झाल्या, काश्मीर आणि पूर्वोत्तर भागातही तसंच झालं. यामुळे देशाचं मोठं नुकसान झालं. काही लोकं शीख बांधवांच्या मनात काही चुकीच्या गोष्टी बिंबवत आहेत. देशाला शीख बांधवांचा अभिमान असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
“मी पंजाबची रोटी खाल्ली आहे. शीख गुरूंच्या परंपरा आम्ही मानतो. ज्या भाषेच्या उपयोग केला जातो त्यानं देशाचं भलं होणार नाही. आंदोलकांना समजवून आम्हाला पुढे जायला हवं. अपशब्द माझ्या खात्यात जाऊ द्या. परंतु सुधारणा होऊ द्या,” असं आवाहनही मोदींनी यावेळी केलं.
संसदेत चर्चेच्या माध्यमातून अनेकांनी भाष्य केले, त्यांचा राग व्यक्त केला, माझ्यावरही टीका झाली, केवढं बोललं गेलं, मी तुमच्या कामी आलो याचा मला आनंद आहे. माझ्यावर राग काढल्यानं तुमचा केवढा राग हलका झाला असेल असा आनंद घेत राहा, चर्चा करत राहा, मोदी आहे संधी घ्या टीका करत राहा, आनंद घ्या…याठिकाणी मनातील राग बाहेर काढल्यानंतर घरी निवांत शांततेत राहता येत असेल असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला.
एमसीपी होता, आहे अन् राहणार; चूक झाली तर माझ्या माथी मारा, चांगलं झालं तर श्रेय तुम्ही घ्या” जगातील प्रत्येक देशासमोर आव्हानं जगातील कोणत्याच देशात आव्हानं नाहीत असं होत नाही, प्रत्येक देशात आव्हान असतात, पण आपण समस्येचा भाग बनावं की समाधानाचा हे स्वत: ठरवावं लागतं, वर्तमानासाठी आणि भविष्यासाठीही काम करायचं आहे असंही नरेंद्र मोदी म्हणाले.







