जळगाव ( प्रतिनिधी ) ;- सातबारा उताऱ्यावरील बोजा कमीकरून देण्याच्या मोबदल्यात फक्त २४० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील तलाठ्याला जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज सोमवार ८ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अटक केली आहे . तलाठी प्रवीण मेश्राम आणि कोतवाल प्रकाश अहिर अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून त्यांना अटक केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. जळगाव एसीबीचे पोलीस उपाधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्यासह पथकाने हि कारवाई केली .








