जामनेर (प्रतिनिधी) – विद्यमान आघाडी सरकार यांनी विधानसभा निवडणूक काळात अनेक घोषणा केल्या परंतु त्या घोषणा फक्त घोषणाच ठरल्या असुन एक ही आश्वासन या सरकारने पूर्ण केलेले नाही . असा घणाघाती टिका आ. गिरीश महाजन यांनी केली . .जामनेर येथील एका मेळाव्यात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते .जामनेर तालुक्यातील जि.प सदस्य , प.स सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी नगरसेवक भाजपा पदाधिकारी यांचा मार्गदर्शन पर मेळावा होता . आगामी निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर शहरातील बाबाजी राघो मंगल कार्यालयात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .
मेळाव्यात आ गिरीश महाजन पुढे म्हणाले की , विद्यमान तीन चाकी सरकार सर्वच आघाड्यांवर हे सरकार पूर्ण पणे अपयशी ठरले आहे . नुकत्याच संसदेत आलेल्या अहवाला नुसार कोरोना परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र सर्वात पिछाडीवर आहे . युती सरकारने केलेल्या विकास कामांमध्ये खोडा घालण्याचे काम हे सरकार करीत आहे . येणाऱ्या आगामी विविध निवडणुका साठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले .आपल्या ताब्यातील संस्था , सांभाळून इतर संस्था आपल्या ताब्यात घेण्याच्या तयारीला लागा .दिलेली जवाबदारी प्रामाणिक पणे पूर्ण करा . वेळोवेळी दिलेल्या सुचना पार पाडा . असे केल्यास कोणत्याही निवडणुका जिंकणे अवघड नाही .आगामी निवडणुका मध्ये तरुणांना संधी द्यावी लागेल .पुढच्या पीढीला समोर आणून पक्ष प्राधान्य देणार आहे . तसेच महिलांना देखील राजकारणात सक्रीय होऊ देण्याचे आवाहनही त्यांनी केले .भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर , महेंद्र बाविस्कर ,दिलीप खोडपे , सभापती जलाल तडवी , जे के चव्हाण , डॉ प्रशांत भोंडे , राजधर पांढरे , बाबुराव घोंगडे , सुनिता पाटील , विलास पाटील , अँड सतिश साठे , अँड शिवाजी सोनार , बाबुराव हिवराळे , आतिष झाल्टे , छगन झाल्टे , कमलाकर पाटील , यांच्यासह तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . सुत्रसंचालन रविंद्र झाल्टे यांनी केले .








