अमळनेर ;- जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश दिघे साहेब यांच्या आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार व म. मुख्याधिकारी यांच्या आदेशान्वये अमळनेर नगर परिषद क्षेत्रातील अवैध नळ जोडणी धारक, घरपट्टटी , नळपट्टी तसेच व्यावसायिक मालमत्ता थकबाकीदार यांच्यावर कार्यवाही करण्याची कार्यवाही चालू आहे. त्यात अवैध नळ जोडणी करणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांचेवर पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी दिले आहेत त्यानुसार शनिवार,रविवारी देखील कार्यालय सुरू असून वसुलीचे काम करण्यात येत आहेत ६ नळ कनेक्शन बंद केले असून मालमत्ता वसुली ७,४०,०००/- रु. वसूल करण्यात आले आहेत. पथकात उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, बिल कलेक्टर शेखर देशमुख, जगदिश चौधरी, सतीश देशमुख, सोमनाथ वंजारी, कमा प्लंबर आहेत.







