मुंबई (वृत्तसंस्था) – एल्गार वाल्यांनी मानसिकता तपासण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यामुळे राज्यात वातावरण बिघडत आहे. यापुढे त्यांना परवानगी देण्याबद्दल विचार करावा लागेल, तसेच एल्गार परिषदेत भडकाऊ भाषण करणारा शरजील उस्मानी ही घाण उत्तर प्रदेशातून आली असून योगी सरकारने आमच्या पोलिसांना सहकार्य करावं, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.
दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु असल्याने त्यावरून देशात राजकारण चांगलंच तापले आहे. तर सत्ताधारी आणि विरोधकामधे टीका टिपणी सुरूच आहे. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाबाबत गंभीर नाही, असं म्हणता शेतकरी हिंसक झाले तर सरकार जबाबदार असल्याची खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच केंद्र सरकारबरोबरच एल्गार परिषदेवरही त्यांनी जोरदार टीका केली आहे. ते नाशिक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
शेतकरी हिंसक झालं तर सरकार जबाबदार आहे. सरकारला शेतकऱ्यांनी हिंसक व्हावं ही अपेक्षा आहे का ? कृषी कायदे मागे घेऊन चर्चा करावी. देशात अराजकता निर्माण व्हावी असं सरकारला वाटतं. जनतेपूढे अहंकार चालत नाही. बहुमत आहे म्हणून अहंकार योग्य नाही. हे राजकीय पक्षांचे नाही तर किसान संघटनांचे आंदोलन आहे. तर सरकारने केलेल्या शिफारशी स्वीकारणं राज्यपालांना बंधनकारक असतं. केंद्रानं राज्यपालांना परत बोलवावं. तर दुसरीकडे फासे टाकण्यासाठी फडणवीसांना शुभेच्छा ५ वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. पेट्रोल भाव नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करावी. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे असावं हे ठरलं आहे, अशा अनेक मुद्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.







