वडती ता. चोपडा ;- तालुक्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण असताना या संकटात उत्पन्नाची नामी संधी समजून शिरजोर झालेल्या वाळू माफियांच्या मुजोरपणा वाढतांना दिसून येत आहे .याचा प्रत्यय 4 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी गोरगावले रस्त्यावर पाहावयास मिळाला . गोरगावले रस्त्यावर अवैध वाळूचे ट्रॅक्टर असल्याची खबर मिळाली असता मंडळाधिकारी आर आर महाजन आपल्या सोबती सह गेले असता त्यांनी अवैध वाळूचे ट्रॅक्टर थांबवले व सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले .पण ट्रॅक्टर चालकाने ऐकले नाही तद्नंतर मंडळाधिकारी आर आर महाजन हे सदर ट्रॅक्टरवर ड्रायव्हरच्या बाजूला बसले व ट्रॅक्टर तहसील कार्यालयाकडे नेण्यास सांगितले पण तरीही ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर गोरगावले गावाकडे नेण्यास सुरुवात केली व थोड्या अंतरावर दहा ते बारा वाळूमाफियांची टोळके उभे होते त्यापैकी ट्रॅक्टर मालक पुढे आला व त्यांनी मंडळाधिकारी महाजन यांना खाली उतरण्यास सांगितले ,मंडळाधिकारी महाजन यांनी खाली उतरण्यास नकार दिल्यावर ट्रॅक्टर मालकाने मंडळाधिकारी यांना अक्षरशः ट्रॅक्टरच्या खाली ओढले व उपस्थित सर्व टोळके मंडळ अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून आले असल्याची माहिती मंडळ अधिकाऱ्यांनी फोन वरून कार्यालयास माहीती दिली .
त्या संदर्भाचे निवेदन अधिकारी व तलाठी संघटनेतर्फे तहसीलदार छगन वाघ यांना देण्यात आले आहे .सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून पुढील तपास कार्य सुरू आहे….
यावर राष्ट्रवादी चे माजी जिल्हाउपाध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी प्रतिक्रिया देत सागितले की काही महसूल कर्मचाऱ्यांचा मिलीभगत मुळे रेती माफिया निर्ढावलेले आहेत







