नवी मुंबई (वृत्तसंस्था) – राजधानी दिल्लीच्या अब्दुल कलाम मार्गावरील इस्रायलच्या दूतावासाजवळ स्फोट झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. परिसरातील चार ते पाच गाड्यांचे या स्फोटात नुकसान झाले. विशेष म्हणजे दिल्ली स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेजही आता हाती लागले आहेत.
या घटनेचा तपास भारतात एनआयए करत आहे. दरम्यान इस्रालयची गुप्तहेर संघटना असलेल्या मोसादने या घटनेचा तपास करण्यासाठी आपली टीम पाठवली आहे. जगातील सर्वात धोकादायक गुप्तहेर संघटना म्हणून मोसादला ओल्काहले जाते. बुधवारी यासंदर्भात मोसादच्या पथकाने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशाच्या पथकांनी आतापर्यंतच्या तपासात झालेल्या प्रगतीची परस्परांना माहिती दिली.
प्राथमिक तपासातून या बॉम्बस्फोटामध्ये इराणचा हात असल्याचे संकेत मिळत आहेत.तपासात भारतीय यंत्रणांना मदत करण्यासाठी मोसादचे पथक खास तेल अवीवरुन भारतात आले आहे. वेगवेगळया सोशल मीडिया अकाऊंटवरुन टेक्निकल डाटा गोळा केला जातोय. तपासामध्ये आम्ही पूर्ण सहकार्य करु, इस्रायलचे भारतातील राजदूत डॉ. रॉन मल्का यांनी स्फोटानंतर सांगितले होते. दूतावासाबाहेरील हा स्फोट कमी तीव्रतेचा होता. त्यात कोणाचाही मृत्यू किंवा कोणी जखमी झाले नाही. फक्त पार्क केलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या. पण या स्फोटामागे संदेश देण्याचा एक निश्चित हेतू होता.
विशेष म्हणजे या दोघांचीही गेल्या वर्षी हत्या करण्यात आली होती. बगदाद विमानतळाजवळ कासीम सुलेमानी यांची ड्रोन हल्ला करून हत्या करण्यात आली होती.याचा बदला म्हणून हा स्फोट घडवण्यात आला का असा देखील सवाल उपस्थित होत आहे.







