पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथील शिक्षिका श्रीमती चंद्रकला लालजी जाधव यांनी महाराष्ट्र शासन प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नाशिक यांच्या आयोजित मराठी भाषा पंधरवाडा निमित्त ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होऊन जळगाव जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. याबद्दल त्यांना शाळेत प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
त्यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, ए. बी.अहिरे, कार्यालय प्रमुख अजय सिनकर तसेच बापू पाटील व इतर शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन नानासो संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, स्कूल कमिटी चेअरमन खलीदादा देशमुख, तांत्रिक विभाग प्रमुख वासुदेव महाजन, उपमुख्याध्यापिका सौ.प्रमिलाताई वाघ, पर्यवेक्षक एन. आर. पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू – भगिनींनी त्यांचे अभिनंदन केले.







