जामनेर (प्रतिनिधी ) ;- जामनेर शहरमध्येराज्यातील शेतकऱ्याचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय मागे घेणे व वाढीव वीज बिल माफ करणे बाबत
आ. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जामनेर महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
भाजप सम्पर्क कार्यालय मोर्चाला सुरवात करण्यात आली . या ठिकाणी प्रसार माध्यमांशी बोलताना आ. गिरीश महाजन यांनी राज्य सरकार वर टीका करताना संगितले की राज्य सरकारच्या गलथान कारभार या मुळे शेतकरी कमालीचे हवालदिल झाले आहे।सातत्याने रोहित्र फेल होणे ,रोहित्र मिळणेस विलंब होणे,विलंबाने मिळालेले रोहित्र नादुरुस्त निघणे ,कमी दाबाने वीज पुरवठा होणे ,पीठगिरणी,सार्वजनिक पाणी पुरवठा इ.बाबीवर त्याचा विपरीत परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत होते .अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता समाधानकारक उत्तर मिळत नाही अश्या अनेक समस्या आहेत .
राज्यात कोरोना सारखी महामारी असतांना सुद्धा जनतेला।शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वाढीव वीज बिल देण्यात आले आहे परिणामी सामान्य माणूस व शेतकऱ्यांन मध्ये तीव्र रोष आहे पुढे महावितरण कार्यालयाला मा.ना.गिरीश भाऊ महाजन यांनी कुलूप लावून राज्य सरकार चा तीव्र निषेध केला.मोर्चा मध्ये चंद्रकांत बाविस्कर भाजप तालुका अध्यक्ष.दिलीप खोडपे सर.गोविंद अग्रवाल ,जलाल तडवी .नवल राजपूत.आनंदा लाव्हरे आतिष झाल्टे जितेंद्र पाटील रवींद्र झाल्टे धोंडू आप्पा पाटील शरद पाटील डॉ.प्रशांत भोंडे अनिस शेख महेंद्र बाविस्कर तुकाराम निकम अमर पाटील कैलास पालवे सर्व नगरसेवक जि.सभापती प.स.सभापती व इतर सर्व भाजपा पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.







