चाळीसगाव ( प्रतिनिधी ) ;- महाराष्ट्रातील आघाडी सरकारने लॉकडाऊन काळातील अव्वाच्या सव्वा बीलं पाठवून सर्वसामान्य वीजग्राहकांची फसवणूक केली. ऊर्जामंत्री थकीत वीज माफीची घोषणा करतात आणि नंतर शब्द फिरवतात. राज्य शासनाच्या या जुलमी निर्णयाविरुध्द भारतीय जनता पक्ष आता रस्त्यावर उतरून हा निर्णय मागे घ्यावा म्हणून आंदोलन करणार आहे. महावितरणाने महाराष्ट्रातील 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस बजावून, 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या,शेतकरी व सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या व आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहणाऱ्या महावितरणाविरोधात चाळीसगाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने दि ५ फेब्रुवारी रोजी सकाळी१० वाजता निषेध मोर्चा काढत ,महावितरणकेंद्र/महावितरण कार्यालय,खान्देश बाजार हिरापुर रोड चाळीसगाव येथे “टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन” करण्यात आले.

या निषेध आंदोलनास खा.उन्मेष पाटील, आ.मंगेश चव्हाण,आजी माजी खासदार, आमदार,किसानमोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपटतात्या भोळे,जेष्ठ मार्गदर्शक चंद्रात्रे बाबा,प्रदेश पदाधिकारी उध्दवराव महाजन,.तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे,युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपील पाटील सर्व आजी माजी शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष,नगराध्यक्षा आशालताताई चव्हाण,,नगरसेवक,जि.प.पं.स.सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी,मंडल पदाधिकारी, आघाडी/मोर्चे पदाधिकारी,गट व गण प्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख, बुथप्रमुख ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते







