जळगाव ( प्रतिनिधी ) ;-मागील आठ ते दहा महिन्यापासून महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थि व पालक आणि संस्था चालक ह्यांचे हाल होत आहेत त्यामुळे पालकांवर आर्थिक बोजा देखील पडत असल्याने त्यांची सुटका व्हावी अशी मागणी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना महाविकास आघाडीच्या वतीने आज निवेदनाद्वारे करण्यात आली .
उत्तर महाराष्ट्र मधील महाविद्यालय परत पूर्ववत सुरू व्हावे यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले . महाविकास आघाडीच्या वतीने विष्णू भंगाळे , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगर सचिव अँड. कुणाल पवार , विद्यापीठ अधीसभा सदस्य अतुल कदमबांडे यांनी केली आहे. यावे ना. उदय सामंत यांनी लवकरच सर्व महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालय कोविंडच्या उपाय योजना करून सुरू होतील असे आश्वासन दिले .








