जळगाव;-एका ४८ वर्षीय व्यक्तीला पक्षाघात झाल्याने दवाखान्यात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून
अजय पांडूरंग रावतकर (वय-४८) रा . बिबा नगर असे मयताचे नाव आहे.
अजय रावतकर यांचा अपघात झाला होता. रुग्णालयात प्रदिर्घ उपचार घेतल्यानंतर ते, नुकतेच घरी परतले असतांना त्यांना पक्षवाताचा झटका आल्याने मंगळवार (ता.२) रोजी कुटूंबीयांनी रुग्णालयात हलवले, मात्र तत्पुर्वीच त्यांचा मृत्यु ओढवला होता. रात्री दहा वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात मयत स्थितीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी अंती त्यास मयत घोषीत केले असून तालूका पेलिसांत अकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक सतीष हाळणोर करत आहेत.







