जळगाव ;- पिंप्राळा परिसरात एकाने जुन्या वादातून भांडण उकरून दगडाचा मारकरून शिवीगाळ केल्याची घटना घडली असून याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, कांचन सचिन सोनवणे (वय-२३) यांचे सचिन सोनवणे यांच्यासोबत दिडवर्षापुर्वी प्रेम विवाह झाला असून दोघेही आनंदाने संसार करत आहे, मात्र, कांचन यांच्या माहेरच्या मंडळींना विवाहाला विरोध असल्याने तिचे मामा आनंदा पांडूरंग जाधव यांनी कुरापत काढली. कांचन सोनवणे यांचे दिर राहुल सोनवेण आई रत्नाबाई सानवणे यांना घेवून पिंप्राळ्यातून जात असतांना कुंभार वाड्या जवळ आनंदा जाधव याने दगड मारुन फेकला.तसेच शिवीगाळ करुन तुम्हाला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत हल्ला चढवला. यात रन्नाबाई व राहुल असे मायलेक किरकोळ जखमी झाले असून कांचन सोनवणे यांच्या तक्रारीवरुन आनंदा जाधव, सुनी बाळू सपकाळे, जिवन सपकाळे (सर्व रा. बौद्ध वाडा पिंप्राळा) यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस नाईक महेंद्र पाटिल करीत आहेत.







