पुणे (वृत्तसंस्था) – पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या विधानावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. हिंदू काय रस्त्यावर पडला आहे ? शरजिल उस्मानी प्रकरणावर फडणवीसांचा संताप व्यक्त केला आहे. उस्मानीवर तातडीने कारवाई करण्याची केली मागणीही त्यांनी माध्यमांशी बोलतांना केली. आता याच मुद्यावरून आमदार नितेश राणे यांनीही शरजीलला दाखवून देऊ, असा इशारा ट्विट करत दिला आहे.

‘शरजील नावाच्या कारट्याला अटक किवा चौकशी होणार नसेल तर त्याला आमच्याकडे सोपवा..
परत कधी हिंदू ना सडका म्हणणार नाही याची जबाबदारी आमची.. एल्गार काय असतो दाखवुन देऊ!!’







