औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिकाकर्ती महिलेची तक्रार
जळगाव ( प्रतिनिधी ) ;-कारागृहातील न्यायालयीन बंदी असलेल्या चिन्या उर्फ रवींद्र जगताप याचा कारागृहात बेदम मारहाणीत मृत्यू झाला होता . तसेच याबाबत मयताची पत्नी मिनाबाई जगताप यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा याबाबत याचिका दाखल केली आहे . मात्र याचिका मागे घ्यावी म्हणून संशयितांची हस्तक असलेले रक्षक हिवरकर आणि देवरे हे दोन्ही मयत बंदीची पत्नी हिच्या घरी जाऊन धमकी देऊन तिच्यावर प्रचंड दबाव आणत असल्याची लेखी तक्रार औरंगाबाद उच्च न्यायालयात केली आहे .
बंदी चिन्या उर्फ रविंद्र जगताप याचा येथील अधिक्षक पेटरस गायकवाड तसेच जेलर जितेंद्र माळी व इतर यांचे आमानुष मारहाणीत झालेल्या मृत्यूनंतर औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे . कारागृहाचे पोलीस कर्मचारी हिवरकर व अनिल देवरे यांचे कडून वारंवार याचिका मागे घेण्याबाबत येत असलेला दबाव तसेच धमक्या येत असून ३१ जानेवारी २०२१ रोजी मयताच्या पत्नीच्या घरी हे दोन्ही रक्षक यांनी जाऊन धमकी देत “केस मागे घ्या, तुमची काय अडचण असेल ती सर्व आम्ही सोडवू, या केस मधील अधिकारी व कर्मचारी यांचे काहीच
होणार नाही, ते फक्त सस्पेंड होतील, तुम्ही लवकर निर्णय घ्या व केस मागे घ्या, मी (श्री.हिवरकर) अनेकदा सस्पेंड झालो आहे. यामुळे काहीच होत नाही ,आम्हाला पुन्हा कामावर घेतात ” अशाप्रकारे अनेक धमकी वजा गोष्टी सांगून, मला लवकर केस परत घ्या असे बोलुन हे दोन जेल पोलीस निघून गेले . असे याचिकाकर्ती महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे . तसेच याचिका कर्ता अनिल बुरकुल यांनी सदर महिला याचीका कर्ता यांचे वर येत असलेल्या दबावामुळे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्हा कारागृह व जेलचे विभागीय उपमाहानिरीक्षक तसेच मा. न्यायालय औरंगाबाद यांचेकडे रितसर तक्रार सादर केलेली आहे. याचिकाकर्ता अनिल बुरकुल, मनोज
जाधव व मला वेगवेगळया प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. अशी तक्रार करण्यात आली असून याची दाखल घ्यावी अशी मागणी मिनाबाई जगताप यांनी न्यायालयाकडे केली आहे.







