• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दृश्‍यम सिनेमाचा प्रभाव ; बालकाचे अपहरण करून त्याचा खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 3, 2021
in क्राईम, भारत, महाराष्ट्र
0

पुणे(वृत्तसंस्था ) – पुण्यातील कोथरुड परिसरात इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या बालकाचे अपहरण करून निर्घृण खून 13 वर्षाच्या मुलानेच दृश्‍यम चित्रपट पाहून त्यातून केल्याचे तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावले आहेत. त्याने मोबाईलवर हा सिनेमा वारंवार बघून खूनाचा कट रचला. आपल्यापेक्षा कोणीही मोठा नसल्याच्या भावनेतून हा खून केल्याची कबुली दिली आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने तपास यंत्रणांनाही तब्बल तीन दिवस चालाखीने उत्तरे देत गुंगारा दिला होता.

विश्वजित उर्फ विशु विनोद वंजारी ( वय 11, रा. केळेवाडी, कोथरूड) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. तो शुक्रवारपासून बेपत्ता होता. त्याचा रविवारी मृतदेह सापडल्यामुळे खळबळ माजली. विश्‍वजीतचा मृतदेह मेट्रो कार्यालयाच्या मागील मोकळ्या जागेत राडारोड्यामध्ये पुरला होता. त्याच्या डोक्‍यावर वार करण्यात आल्याच्या खुणा होत्या.

विधीसंवर्गीत मुलाची आई खासगी कंपनीत क्‍लार्क तर वडील वाहनचालक आहेत. लहानपणापासून त्याची वर्तवणूक चुकीची होती. त्याला आजवर तीन शाळांमधून काढून टाकण्यात आले होते. त्याच्या मनामध्ये नेहमी श्रेष्ठत्वाची भावना असायची. आपल्यापेक्षा इतर कोणीही मोठे नाही आणि आपले सगळ्यांनी ऐकलेच पाहिजे असा त्याचा हट्ट असे. खेळताना त्याच्यावरच नेहमी डाव येत असल्याचाही राग त्याच्या मनात होता. विश्‍वजीतला माझे तु ऐकले नाहीस तर परिणाम वाईट होतील असा दम देत होता.

त्याने काही दिवसांपुर्वीच दृश्‍यम हा सिनेमा मोबाईलवर डाऊन लोड केला. तो सीनेमा वारंवार बघत असे. यातूनच त्याने विश्‍वजीतच्या खूनाचा कट आखला. त्याने विश्‍वजीतला खेळता खेळता राडा रोडा असलेल्या मैदानावर नेले होते. तेथे त्याच्या डोक्‍यात कठीण वस्तूने घाव करुन त्याचा खून केला. यानंतर त्याचा मृतदेह राडा रोड्यात पुरला.

पोलिसांना पहिल्या दिवसापासूनच विश्‍वजीतचा मित्र असलेल्या 13 वर्षीय विधिसंवर्गीत मुलावर संशय होता. त्याला ताब्यात घेऊन गुन्हे शाखा व कोथरुड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केली होती. मात्र तो इतका चालाख होता की, त्याने उत्तरे देताना आपण गुन्हा केल्याचा थांगपत्ताही तब्बल तीन दिवस पोलिसांना लागून दिला नाही. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला पोलिशी खाक्‍या दाखवता येणेही शक्‍य नव्हते. मात्र पोलिस यंत्रणेने त्याच्याशी गोड बोलून सातत्याने वेगवेगळ्या प्रश्‍नांची सरबत्ती करत एका क्षणी त्याच्याकडून गुन्हा केल्याचे काढून घेतल्याची माहिती पोलीस यंत्रणेने दिली.


 

 

Previous Post

कोविड लस सुरक्षितच सोशल मिडीयातील चर्चेतून गैरसमज न करता लसीकरण यशस्वी करा — डॉ वैभव पाटील

Next Post

आपचे तीन खासदार निलंबित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आपचे तीन खासदार निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon