जळगाव;- डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नुकतीच रॅगिंग कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत अॅन्टीरॅगिंग स्कॉड देखील गठीत करण्यात आला आहे.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित या बैठकीला अॅन्टीरॅगिंग समितीचे अध्यक्ष डॉ.एन.एस.आर्विकर, सभासद डॉ.चंद्रैय्या कांते, डॉ.विठ्ठल शिंदे, डॉ.बापुराव बिटे, डॉ.माया आर्विकर, डॉ.प्रमोद भिरुड, मुलींच्या वसतिगृहाच्या रेक्टर अर्चना भिरुड, विद्यार्थी संस्कृती भिरुड, भावेश फालक, एनजीओ रिप्रेझेंटीव्ह डॉ.प्रशांत वारके, माध्यम प्रतिनिधी चेतन साखरे, डॉ.अतुल चौधरी, डॉ.सविता लोखंडे, मुलांच्या वसतिगृहाचे रेक्टर सुरेंद्र गवांडे, सतिश गाडगे आदि उपस्थीत होते. समितीचे कायेदेविषयक सल्लागार ड.सतिश गाडगे यांनी अॅन्टीरॅगिंग संदर्भातील नियमावली विषद केली. तसेच समितीचे अध्यक्ष डॉ.एन.एस.आर्विकर यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सुविधांची माहिती दिली. या वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग करण्याला पूर्णपणे प्रतिबंध असून यासंबंधीची एखादी तक्रार आली तरीदेखील त्याचे गांर्भीयाने दखल घेवून ति समस्या तात्काळ सोडविली जात असल्याचे सांगितले. अॅन्टीरॅगिंग संदर्भात आवश्यक त्या नियमावलीचे जनजागृतीपर फलक देखील महाविद्यालयात लावण्यात आले आहे. या फलकांवर समितीतील सदस्यांचे नावे यासह भ्रमणध्वनी क्रमांक देखील देण्यात आले आहे. स्कॉडमध्ये यांचा समावेश अॅन्टीरॅगिंग स्कॉडमध्ये प्रमोद भिरुड, डॉ.माया आर्विकर, सुरेंद्र गवांदे, अर्चना भिरुड, डॉ.बापुराव बिटे यांचा समावेश आहे.








