नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) ;– विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या कन्येच्या रूपाने बॉलीवूड आणि क्रिकेट विश्वाला नवीन सेलिब्रिटी कीड मिळाली आहे. सोमवारी विरुष्काच्या या कन्येचे नामकरण झाले. अनुष्कानेच स्वतः सोशल मीडियावर आपल्या कन्येचे नवीन नाव शेअर केले आहे. अनुष्का आणि विराटने आपल्या कन्येचे नाव वामिका असे ठेवले आहे. हे नाव घोषित करताना अनुष्काने एक पोस्ट देखील केली आहे.

त्यामध्ये पांढऱ्या शुभ्र रंगाचा एक घोडा बसलेले चित्र दिसते आहे. त्या घोड्यासमोर एक लहान मूल बसलेले दिसते आहे. आपल्या कन्येचे नाव निश्चित करताना विराटचे अद्याक्षर ‘व्ही’ आणि अनुष्कामधील ‘केए’ ही अक्षरे वापरली गेली आहेत.
मात्र वामिका हे नाव निश्चित करताना आणखी काय विचार केला गेला, हे अद्याप या सेलिब्रिटी कपलने उघड केलेले नाही. या पोस्टबरोबरच विराट आणि अनुष्काने आपल्या बाळाबरोबरचा एक फोटोही शेअर केला आहे. विराटने या फोटोला खूपच भावनिक कॅप्शन दिली आहे. या छोट्याशा फ्रेममध्ये माझी सर्व दुनिया सामावली गेली आहे, असे त्याने म्हटले आहे.







