जळगांव :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व शैक्षणिक प्रशाळा आणि संलग्नीत महाविद्यालयांमध्ये एम.एस्सी. भाग-१ करिता रिक्त असलेल्या जागांवर केंद्रीय पध्दतीने प्रवेशाची चौथी फेरीचे आयोजन ४ फेब्रुवारी पासून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यातील कोरोनाची स्थिती व विद्यार्थ्यांकडून विद्यापीठास प्राप्त झालेले अर्ज विचारात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून एम.एस्सी.भाग-१च्या सर्व शैक्षणिक प्रशाळा आणि संलग्नीत महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर केंद्रीय पध्दतीने प्रवेशाची चौथी फेरीचे आयोजन ४ फेब्रुवारी पासून करण्यात येत आहे. चौथ्या फेरीचे वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर www.nmu.ac.in वर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ५ ते ७ फेबुवारी दरम्यान विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरुन ते कन्फर्म करावाचे आहेत. तरी ज्या विद्यार्थ्यांना आधीच्या तीन प्रवेश फेरीत प्रवेश मिळाला नाही त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. चतुर्थ फेरी संपल्यानंतर रिक्त व वाढीव जागांवर संबंधित महाविद्यालये / प्रशाळा यांनी मागणी केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करुन गुणवत्तेनुसार पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.







