वडती ता.चोपडा :- सीईडी फाउंडेशन व एमएसएमई भारत सरकार तर्फे सर्वेक्षण निकषानुसार राष्ट्रीय पातळीवर सीबीएसई पॅटर्नच्या 24000 विद्यालयापैकी निकषपूर्तता करणाऱ्या 900 विद्यालयातर्फे 5 स्टार रेटिंग मानांकन साठी प्रस्ताव सादर करण्यात आले.त्यामध्ये टॉप 100 विद्यालयांची रेटिंग साठी निवड झाली. विशेष बाब म्हणजे पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल चोपडा या सीबीएसई विद्यालयाने राष्ट्रीय पातळीवर टॉप 100 मध्ये 57 वे स्थान प्राप्त केले. विद्यालयातील भौतिक सुविधा व परिसर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, सुदृढ विद्यार्थी निर्मिती साठी क्रिडा क्षेत्रातील विविध प्रकारच्या खेळात मिळविलेले यश ,विविध स्पर्धा परीक्षातील कामगिरी,विद्यार्थ्यांना परीक्षा भीती घालविण्यासाठी केलेली तणावमुक्त वातावरण निर्मिती,शालेय स्वच्छता व पर्यावरण रक्षणासाठी केलेली भरीव कामगिरी अशा 100 विविध निवडीच्या निकषांवर फाईव्ह स्टार रेटिंग हे स्थान प्राप्त झाले.त्यामुळे पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

राष्ट्रीय स्तरावरील हा सहावा
पुरस्कार सोहळा लिला एम्बुंलेन्स, गुरुग्राम दिल्ली येथे मालदीव चे शिक्षणमंत्री डॉ. अब्दुल रशिद, सीबीएसई बोर्डाचे सचिव डॉ. अनुराग त्रिपाठी, सीबीएसई बोर्डाचे परीक्षा विभाग प्रमुख संन्यम भारद्वाज,राष्ट्रीय मुक्तविद्यालय शिक्षण संस्थान चे चेअरमन सी.बी.शर्मा, सीईडीचे संस्थापक चेअरमन डॉ. प्रियदर्शी नायक या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी संस्थेचे संचालक पंकज बोरोले व प्राचार्य मिलिंद पाटील यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व प्रमाणपत्र स्विकारले.उत्तर महाराष्ट्रातील निवड झालेल्या पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलने अगदी अल्पावधीतच आपली सर्व शैक्षणिक गुणवत्ता उंचावली आहे.विद्यालयात सुजज्ज सर्वअत्याधुनिक सुविधा युक्त अशी भव्य होस्टेल ची व्यवस्था निसर्गरम्य स्वतंत्र परीसरात आहे.संस्था व सर्व शिक्षक विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेतात.ही बाब सदरील मानांकन प्राप्तीसाठी सकारात्मक ठरली आहे.
सदरील विद्यालयाच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले, नारायण बोरोले,गोकुळ भोळे, भागवत भारंबे ,शिक्षण विभाग यांनी प्राचार्य मिलिंद पाटील व शिक्षक वृंद कर्मचारी यांचे अभिनंदन केले.संस्थेच्या विविध शैक्षणिक विभागाचे प्रमुख एम.व्ही पाटील, व्हि.आर.पाटील, प्राचार्य किशोर पाठक, मुख्याध्यापिका सौ. नीता पाटील, बालवाडी प्रमुख सौ. रेखा पाटील यांनी विद्यालयात सर्व संचालक मंडळ ,प्राचार्य मिलिंद पाटील व सर्व शिक्षकांचा सत्कार व अभिनंदन केले.सदरील सन्मानाने शैक्षणिक दर्जा जोपासणारे फाईव्ह स्टार विद्यालय म्हणून परिसरात ख्याती झाली आहे .






