जळगांव,;– कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागातील प्रथम वर्ष एम.एस.डब्ल्यू. अभ्यासक्रमाच्या रिक्त जागा तसेच नव्याने मंजूर झालेल्या एकूण अकरा जागांवर प्रवेशासाठी गुणवत्ता यादीतील पात्र व इच्छूक विद्यार्थ्यांनी २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता समाजकार्य विभागात आवश्यक मूळ कागदपत्रे व साक्षांकीत प्रतींसह उपस्थित रहावे. या प्रवेशफेरीत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नंतर दावा करता येणार नाही तसेच प्रवेश प्रक्रियेसाठी कोवड-१९ संदर्भातील सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष प्रा.मनीष जोशी यांनी कळविले आहे.








