सावदा ;- वरणगाव येथील हरविलेल्या व्यक्तीचा मृतदेह पालघाटात संशयास्पद आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
चांगो रामदास झोपे (वय-६९) रा. झोपेवाडा वरणगाव ता. भुसावळ हे आपल्या मुलगा राकेश झोपे व सुनसह राहतात. मुलगा व सुन हे बाहेरगावी फिरायला गेले होते. चांगो झोपे यांच्याशी मुलगा राकेश यांचे शेवटचे बोलणे २९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता झाले होते. मुलगा राकेश गावाहून घरी परत आल्याने घराला कुलूप लावले दिसून आले. वडील चांगो झोपे यांची नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू केली. ते मिळून आले नाही म्हणून वरणगाव पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्याम, खिरोदा येथून जवळ असलेल्या पालघाटातील बोरघाटात हरविलेले व्यक्त चांगो झोपे यांचा मृतदेह आज सकाळी संशयास्पद आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळतात सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली आहे.








