नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशातील 75 वर्षावरील नागरिकांना पेन्शनमधून मिळणाऱ्या उत्त्पन्नावर रिटर्नपासून मुक्ती मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज देशाचे बजेट सादर करत आहेत.

देशाच्या स्वतंत्र्याच्या 75 व्या वर्षात ज्येष्ठांना नमन करताना मी त्यांच्यासाठी नवी तरतूद केली आहे. 75 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्या ज्येष्ठ नागरिकांना केवळ पेन्शन आणि त्यावरील व्याजातूनच उत्पन्न मिळते त्यांना पेन्शनमधून मिळणाऱ्या उत्त्पन्नावर रिटर्न न भरण्याचा मी प्रस्ताव मांडत आहे.
तसेच ज्यांचा कर थकला आहे अशांना पुन्हा रिटर्न भरण्यासाठी 6 वर्षे जुन्या आणि गंभीर प्रकरणांमध्ये दहा वर्षे जुनी खातेवही काढावी लागेल. या कालावधीच्या मर्यादेत बदल करुन ती सहा वर्षावरुन तीन वर्षे करण्यात आली आहे. गंभीर प्रकरणांमध्ये ही दहा वर्षे तेवढीच ठेवली जाईल जेव्हा 50 लाखापेक्षा अधिकची करचोरी झालेली असले. करसंबंधी प्रकरण संपवण्यासाठी ‘विवाद से विश्वास’ ही योजना सुरु आहे. यामध्ये एक लाखाहून अधिक करदात्यांनी प्रकरण संपवली असल्याची माहिती निर्मला सीतारामण यांनी दिली.







