नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2021 -22 या वर्षासाठीचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सोमवारी संसदेत सादर केला आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देत सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी त्या काय करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. याच अर्थसंकल्पावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.

‘लघु, लघु आणि मध्यम उद्योग; आरोग्य तसेच संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक वाढवली पाहिजे’ असं मत ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलं आहे.







