जळगाव;- जागतिक पातळीवर प्रत्येक कार्य मग ते उपक्रम, कार्यक्रम, आंदोलन, अभियान असो युवावर्गावर सर्वांच्या नजरा असतात. अशा युवा वर्गास शांततेच्या मार्गाने नेऊन सकारात्मक व्यक्तिमत्व घडविणा·या ब्रह्माकुमारी ज् युवा प्रभागाचा `युथ फॉर ग्लोबल पीस` उपक्रम खरोखरच स्तुत्य आणि अनुकरणीय असा आहे असे प्रतिपादन डॉ. प्रविण मुंडे जिल्हा पोलिस अधिक्षक, जळगाव यांनी केले.

युवकांच्या मदतीने जागतिक शांततेसाठी ब्रह्माकुमारीज् युवा प्रभागातर्फे राष्ट्रीय पातळीवर व्यापक अभियान राबविले जात असून त्याचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी डॉ. मुंडे बोलत होते. आज युवक प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून त्याच्या शक्ति आणि गुणांचा मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी, जागतिक शांतीसाठी कौशल्याने वापर करणा·या या प्रकल्पाने युवा वर्गांचा सर्वांगिण विकास तर होईल परंतु सामाजिक सलोखा आणि सदभावना आदि मूल्येंही वृद्धिंगत होतील असेही ते म्हणाले. तत्पूर्वी अभियानाचा शुभारंभ डॉ. प्रविण मुंडे, ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी, डॉ. किरण पाटील, ब्र.कु. संदिप भाई यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
अभियानाचा एक भाग म्हणून शहरात शांती यात्रा काढण्यात आली. त्यासही मान्यवरांनी हिरवा झंडा दाखवून सुरुवात केली. ब्रह्माकुमारीज् युवा प्रभागातर्फे सन 2021 हे वर्ष विश्व शांतीसाठी युवक अर्थात् यूथ फॉर ग्लोबल पीस म्हणून जगभरात साजरे केले जात आहे. 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिवसापासून या उपक्रमाची सुरुवात झालेली असून 12 ऑगस्ट अर्थात आंतर राष्ट्रीय युवक दिवसापर्यंत या प्रंकल्पाअंतर्गत विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. सर्व कार्यक्रम कोवीडची पाश्र्वभूमी लक्षात घेता शासकिय नियमांच्या अधिन राहून दिशानिर्देशाचे पालन करुन आयोजित करण्यात आलेत.







