जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाच्या एम.ए.प्रथम वर्षासाठी रिक्त जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे. एम.ए. जनसंवाद आणि पत्रकारिता हा दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम असून कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. प्रसार माध्यमे, शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये विविध पदांसाठी विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी आहेत. विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर प्रवेशासंबंधीची माहिती उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी विभाग प्रमुख डॉ.सुधीर भटकर ( मो.नं. ९४२३४९००४४ ) व डॉ.विनोद निताळे (मो.न. ९८६००४६७०६) अथवा ०२५७-२२५८००८, २२५७४३६, २२५७४४५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.








