पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी);- माहेरहून घर बांधण्याकरिता १ लाख रुपये आणावेत या मागणीसाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी मुंबईच्या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावखेडा येथील प्रतिभा रामनंदन पाल (वय २४) यांचा विवाह भांडूप येथील रामानंद गिरधारी पाल याच्यासोबत २०१९ ला झाला होता .लग्नानंतर काही महिन्यानंतरच पतीसह सासरच्या मंडळींनी घर बांधण्यासाठी माहेरुन १ लाख रुपये आणावे यासाठी छळ सुरु केला होता . त्यामुळे प्रतिभा पाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती रामानंद पाल, नणंद-किरण पाल, सुमन पाल, नंदलाल गिरधारी पाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश ठाकरे करत आहेत.







